अकोल्यातील रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. दत्तराज विद्यासागर ह्यांनी रोबोटिक्स हा क्लिष्ट विषय अतिशय सोप्या पद्धतीने शिकविण्याची एक नवीन पद्धती निर्माण केली आहे. इयत्ता ७ वी पासून इंजिनीरिंग कॉलेज पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना हा विषय सोपा करून, आणि त्यातील प्रात्यक्षिकांवर भर देऊन ते हा विषय शिकवीत आहेत.
मागील 15-20 वर्षांपासून विद्यासागर अकादमी अकोला अंतर्गत, विदर्भातील विद्यार्थ्यांना हा विषय ते शिकवीत आहेत. आपल्या विदर्भातील विद्यार्थी उच्च शिक्षणात कोठेही मागे राहू नये आणि रोबोटिक्स सारख्या आधुनिक विषयाचे त्याला अत्यंत माफक स्वरुपात शात्रशुद्ध शिक्षण मिळावे हा प्रा. दत्तराज विद्यासागर यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात १०० पेक्षाही जास्त रोबोटिक्स विषयाच्या कार्यशाळा, शाळा आणि महाविद्यालय स्तरावर घेतल्या आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोबोटिक्स विषयाचे प्राथमिक शिक्षण घेत, विद्यार्थ्यांनी GMRT-TIFR, National Innovation Foundation, Technothlon अशा विविध प्रकारच्या रोबोटिक्स स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे. विद्यार्थ्याच्या अंगी असलेले गुण हेरून, विविध कल्पक प्रोजेक्ट्स, विद्यार्थ्यांकडून बनवून घेण्यात त्यांचे विशेष लक्ष असते.
त्यांच्या या यशस्वी प्रयत्नाची, अमेरिकेतील EEWEB या इंजिनीरिंग विषयांना वाहिलेल्या मासिकाने दखल घेतली. रोबोटिक्स मधील त्यांच्या सोप्या आणि शास्त्रशुद्ध शिक्षण प्रणालीचा गौरव करून या मासिकाच्या website वर त्यांचा इंटरव्यू नुकताच प्रकाशित केला आहे.
अकोलावासियांसाठी आणि विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे हे प्रयत्न भूषणास्पद आहेत. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा परिचय करून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी त्यातून प्रेरणा घेण्यासाठी हा इंटरव्यू वाचण्यासाठी www.eeweb.com या website ला अवश्य भेट द्या.