Career in Robotics

विद्यार्थी मित्रानो, तुम्ही अशी कधी कल्पना केली आहे का की एक प्रगत रोबोट तुमच्या घरी तुम्ही विकत आणलाय आणि तो तुमच्या घरातील जवळजवळ सर्व कामे अगदी बिनबोभाटपणे पार पडतोय? घर स्वच्छ ठेवतोय, कार धुवून स्वच्छ करतोय, तुमच्या घरातील किचनमधील सगळी कामे करतोय किंवा चक्क तुमचे हातपाय सुद्धा दाबून देतोय ? इत्यादी, इत्यादी…

पण मित्रानो ह्या कल्पना आता प्रत्यक्षात यायला फार काही जास्त काळ आपल्याला वाट पहावी लागेल असे वाटत नाही. कारण आधुनिक विज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे नजीकच्या भविष्यात हे सहज शक्य होणार आहे.

रोबोटिक्सचे क्षेत्र हे अतिशय जलद गतीने आता व्यावसायिक रूप धारण करीत आहे, हि बाब ११वी–१२वी पासूनच विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवी. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानातील काही मोजक्या, रोमांचक आणि मनोरंजक विषयांपैकी रोबोटिक्स हा महत्वाचा विषय आहे. शिवाय  रोबोटिक्समध्ये अभियांत्रिकी दृष्टीकोन फारच महत्वाचा मानला जातो. किंबहुना रोबोटिक्स हा अभियांत्रिकीचा एक अविभाज्य घटक आहे असे म्हणणे वावगे ठरू नये! उदाहरणार्थ, काही विशिष्ट अभियांत्रिकी प्रक्रियांचा वापर करून रोबोटिक्सच्या डिझायनिंग मधील बरेच क्लिष्ट प्रश्न सहज सोडविता येतात आणि त्यातूनच मग अगदी वास्तविक स्वरूपाचा रोबोट बनविणे शक्य होते. रोबोटिक्स उद्योग फार झपाट्याने एका विराट विश्वात रुपांतरीत होत आहे. ज्यामध्ये सहाय्यक कर्मचाऱ्यांपासून पासून प्रोग्रामर्स, डीझाईनर्स, ऑपरेटर्स, टेस्टर्स, हार्डवेअर इंजीनिअर्स, ईलेक्ट्रोनिक्स इंजीनिअर्स, मेकानिकल इंजीनिअर्स, असे एक ना अनेक प्रकारच्या कुशल कर्मचाऱ्यांची गरज असते. रोबोट विकसित करून, त्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी अशा वेगवेगळ्या अभियांत्रिकी आणि सैद्धांतिक विज्ञानातील कुशल व्यक्तींना जबरदस्त मागणी आहे. अगदी प्राथमिक पातळीपासून रोबोटीक्सचा अभ्यास करणे ही आजच्या काळाची गरज आहे आणि ह्या आधुनिक काळात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना तर ही एक सुर्वणसंधी आहे. ईलेक्ट्रोनिक्स, मेक्यानीक्स, गणीत, पदार्थविज्ञान, संगणक प्रोग्रामिंग, हुमन एनाटोमी, मानसशास्त्र इत्यादी विषयातील कुशल व्यक्तीचा रोबोटिक्समध्ये उपयोग होतो आणि हातभार लागतो. थोडक्यात, विविध विषयातील विद्यार्थ्यासाठी रोबोटिक्सच्या क्षेत्रात जॉब मिळविण्याच्या खूप संधी आहेत, त्यामुळे काहीतरी वेगळे करून दाखवायचे अशी महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांनी ह्या क्षेत्रात अवश्य उतरावे.

Jobs in Robotics

अशा जॉबमध्ये विशिष्ट मागणी प्रमाणे नवीन रोबोटचा आराखडा तयार करणे, त्याला मूर्त स्वरूप देणे, “कृत्रिम ज्ञान” (Artificial Intelligence) देणे, मेंटेनन्स करणे आणि ह्यातूनच नवनवीन संशोधन करणे अशी महत्वाची कामे करावी लागतात.

ह्याशिवाय, झपाट्याने विकसित होणाऱ्या ह्या तंत्रज्ञानात स्वतःला अपडेट करणे, हि रोबोटिक्स क्षेत्रात यशस्वी करिअर घडविण्याची “गुरुकिल्ली” आहे. अचाट आणि अफाट कल्पनाशक्तीचा वापर करू शकणाऱ्या व्यक्तींना ह्या क्षेत्रात विशेष मागणी आहे, हे सांगण्याची गरजच नाही.

वैद्यकीय क्षेत्रापासून ते युद्धभूमीवर वापरल्या जाणाऱ्या रोबोटपर्यंत आणि घरकाम करणाऱ्या रोबोट पासून अंतरिक्षात संचार करणाऱ्या रोबोट पर्यंत वेगवेगळ्या अफलातून यांत्रिक प्रणाली विकसित करण्यासाठी कुशल इंजिनिअर्सची प्रचंड मागणी आहे.

  • रोबोट डिझाईन करणे (विशिष्ट मागणीनुसार)
  • वेगवेगळ्या प्रायोगिक तत्वांवर संशोधन करणे
  • रोबोट हार्डवेअर मधील इलेक्ट्रोनिक्स सर्किट्स बनविणे आणि कार्यरत करणे
  • रोबोटसच्या वेगवेगळ्या चाचण्या घेणे
  • रोबोटची स्थापना (Installation) करणे
  • त्याचे प्रोग्रामिंग रूटीन्स चेक करणे आणि संबंधित हालचालीचा (Kinetics & Kinematics)  अभ्यास करणे
  • गरज आणि मागणीनुसार रोबोटप्रणाली रुपांतरीत करणे
  • ट्रबलशुटींग करणे (हा एक क्लिष्ट भाग आहे आणि ह्याकरिता अत्यंत अनुभवी अशा इंजिनिअर्सची प्रचंड मागणी आहे. कारण ह्यामध्ये बाह्य व आंतरिक बिघाड असे दोन भाग असतात. बाह्य बिघाडामध्ये मेक्यानिकल आणि इलेक्ट्रिकल प्रक्रियांचा उपयोग होतो आणि अंतगर्त बिघाडात इलेक्ट्रोनिक्स आणि प्रोग्रामिंग तंत्रज्ञानाचा वापर होतो)
  • रोबोटचे वेगवेगळे पार्टस अलग करणे, तपासणे आणि गरजेनुसार बदलणे अथवा रुपांतरीत करणे
  • रोबोट बनविणे हे एक “टीमवर्क” असल्यामुळे आपल्या  सहकार्यांना – जसे ऑपरेटर्स, टेक्नीन्शिअन्स, वर्कर्स इत्यादींना ट्रेनिंग देणे
  • प्रोग्रामिंग, टेस्टिंग, असेब्लिंग, ट्रबलशुटींग, रिसर्च वर्क इत्यादींचे रेकॉर्ड ठेवणे, वगैरे वगैरे …..

Future in Robotics

आपण ज्या विज्ञान काल्पनिक पाहतो-वाचतो, त्यातील सर्व अचाट आणि अफाट कल्पना खरोखरीच वास्तवात येतील का? वेगवेगळ्या व्यवहारात, वेळप्रसंगी रोबोट मानवाची जागा घेतील का? कोणत्या क्षेत्रात रोबोटचा वापर जास्त होईल? रोबोट स्व:ताचीच उत्पत्ती करू शकतील का? ह्या आणि अशा असंख्य प्रश्नाची स्थूलमानाने खालीलप्रमाणे उत्तरे देता येतील. ह्यामध्ये मी रोबोटिक्सच्या  उपयोगितेवर जास्त भर देत आहे.

घरगुती रोबोट्स

दैनंदिन कामकाज करणे, घरकाम करणे व बागेची निगा राखणे, घराची चौकीदारी करणे अशी असंख्य परंतु अत्यंत क्लिष्ट कामे करण्यासाठी रोबोट्स विकसित करणे चालू आहे. आपल्या दैनंदिन व्यवहारातली सोपी वाटणारी कामे रोबोट कडून करून घेताना अत्यंत क्लिष्ट प्रणालींचा वापर करावा लागतो, हे इथे नमूद करणे आवश्यक आहे. घरगुती रोबोटचा सगळ्यात मोठा क्लिष्ट भाग म्हणजे, त्याला  करावयाच्या कामांची विशिष्ट पद्धतीने “बांधणी” करणे आणि स्थानपरत्वे बदल होत असल्यामुळे अशा रोबोट्सचे “फ्रेमवर्क” बनविणे जवळजवळ अशक्य आहे. तरीसुद्धा विशिष्ट चाकोरीबध्द घरकामांसाठी रोबोट्स बनविणे सुरु आहे.

सरंक्षण व्यवस्थेतील रोबोट्स

चौकीदारी करणे, संरक्षित क्षेत्राचे निरीक्षण करणे, बॉम्ब निष्क्रिय करणारे पथक, दंगलग्रस्त भाग हाताळणारे पथक, पोलीस दल, इत्यादी पथकांचे अथवा दलांचे संरक्षक “ढाल” बनून नेतृत्व करणे.

बचाव कार्यात मदत

बचाव कार्यात मदत करणारे रोबोट्स आजकाल बऱ्याच ठिकाणी वापरले जातात. भूकंप, चक्रीवादळ, ज्वालामुखी उद्रेक, दंगल, आग, इत्यादी कृत्रिम अथवा नैसर्गिक आपत्तींमध्ये बचाव कार्य करण्यासाठी रोबोट्स वापर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.

सामरिक रोबोट्स

युद्धभूमीवर अचूक आणि अत्यंत संहारक रीतीने हल्ला करण्यासाठी रोबोट्सचे काही विशिष्ट रुपांतरीत मोडेल विकसित केली जात आहेत. हा थोडा क्लिष्ट भाग आहे, कारण रोबोटिक्सच्या मुलतत्वानुसार रोबोट हा मानवाला इजा करू शकत नाही. “आयझॅक असिमोव्ह” नावाच्या विज्ञान काल्पनिका लिहिणाऱ्या लेखकाने, ह्या संदर्भात तीन नियम बनविले आहेत. ह्यालाच “रोबोटिक्सचे” तीन नियम” (Laws of Robotics) असे म्हणतात परंतु युद्धभूमीवर युद्ध खेळणाऱ्या रोबोटमध्ये, काही विशिष्ट प्रोग्रामिंग करून व इलेक्ट्रोनिक्स हार्डवेअरचा वापर करून ह्या तीन नियमांना शिथिल करता येते आणि युद्धामध्ये संहारक व अचूक आघात करणारे रोबोट तयार करता येतात.

कृत्रिम बुध्दिमत्ता (Artificial Intelligence)

रोबोट्सचा वापर थिंकिंग मशीन्स अथवा सिस्टम्स ह्या करीता देखील केल्या जात आहे. ह्याचप्रमाणे कारखान्यात चाकोरीबध्द काम करणारे रोबोट्स आत भारतातसुद्धा विकसित होत आहेत. चाकोरीबध्द काम करण्यासाठी रोबोट्स विकसित करणे तसे सोपे आहे कारण त्यामध्ये फार क्लिष्ट स्वरूपाचे प्रोग्रामिंग करण्याची आवश्यकता नसते. तर मित्रांनो, अशा प्रकारे रोबोटिक्सचा विविध क्षेत्रात उपयोग केला जात आहे. हे क्षेत्र किती व्यापक आहे हे आपण पहिले. पण ह्यातून विद्यार्थ्यांना आपले करिअर कसे घडविता येईल, हे आता पाहूया.

Career Opportuinities in Robotics

सगळ्यात पहिले ह्या क्षेत्रात तुमची रुची – अर्थात इंटरेस्ट – असणे अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना मी तर म्हणेल, कि ज्यांना ह्यात विशेष रुची नाही अशा विद्यार्थांनी सुद्धा ह्यामध्ये एकदा तरी “डोके” घालून पहावे. कारण हे क्षेत्र अतिशय मनोरंजक आणि तितकेच आव्हानात्मक आहे. 

आपल्या भारतामध्ये २००६ साली वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून बनविलेले, कारखान्यात आणि काही विशिष्ट क्षेत्रात काम करणारे रोबोट्स बनविण्यात आले.त्यांची संख्या अंदाजे २५७ इतकीच होती. पण २००८ साली ती जवळजवळ दुप्पट झाली आणि आजच्या काळात अंदाजे १८००० पेक्षा जास्त रोबोट विविध क्षेत्रात, केवळ आपल्या देशात कार्यरत आहेत. ह्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता कि रोबोटिक्स किती झपाट्याने प्रगती करीत आहे. दिवसेंदिवस ह्याची मागणी वाढतच आहे.

रोबोटिक्समध्ये बी.टेक. आणि नंतर एम. टेक. (पदव्युत्तर) अभ्यासक्रम भारतात वेगवेगळ्या महाविद्यालयात आणि विद्यापीठात उपलब्ध आहेत. इयत्ता ११ वी व १२ वी करून (मुख्यत: इलेक्ट्रोनिक्स मधून) तुम्ही पुढील शिक्षण घेऊ शकता.

बी.टेक. झाल्यानतर रोबोटिक्समध्ये एम. टेक. करून प्राविण्य प्राप्त करणे अत्यंत आवश्यक आहे. आता बी.टेक. किंवा बी.ई. करताना नेमकी कोणती शाखा निवडायची ह्यावर तुमचे रोबोटिक्स मधील पुढचे करिअर निश्चित करता येते. उदा. जर तुम्ही बी.ई. मेक्यानिकल केले तर रोबोटिक्स मध्ये एम. टेक. करून रोबोटिक्स क्षेत्रात मेक्यानिकल सिस्टममध्ये  करिअर घडवू शकता. जर बी.ई. इलेक्ट्रोनिक्स केले तर एम. टेक. नंतर तुम्ही रोबोटिक्स हार्डवेअर एक्सपर्ट बनू शकता. आज रोबोटिक्स हार्डवेअर इंजिनिअरला जगात सर्वात जास्त मागणी आहे. इलेक्ट्रोनिक्स विषय घेऊन अगदी ११-२ वी पासून शिकणाऱ्या विद्यार्थासाठी हे खूपच सोपे असते. कारण स्थूल मानाने रोबोटिक्सचे तीन विभाग आहेत: मेकनिक्स, इलेक्ट्रोनिक्स आणि कोडींग अर्थात प्रोग्रामिंग.

आणि गंमतीची गोष्ट अशी कि ज्यांना इलेक्ट्रोनिक्सचे सखोल ज्ञान आहे असे विद्यार्थी कोडींग/ प्रोग्रामिंगचे (C ++, Java, Oracle वगैरे) चे अवांतर परंतु चांगले अभ्यासक्रम पूर्ण करून, रोबोतीक्समध्ये दुहेरी करिअर करू शकतात. अशा इंजीनिआर्सची  मागणी फार जास्त आहे. कारण, जरी अविभाज्य असला तरी, हा भाग बाह्य आणि मयार्दीत स्वरूपाचा आहे. त्यामुळे केवळ मेक्यानिकल अथवा कम्प्युटर इंजिनिअरीग करणाऱ्यांना दुहेरी करिअर करणे जड जाते. ह्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा सेमीकंडक्टर आणि प्राथमिक स्वरुपात इलेक्ट्रिकल टेक्नोलोजीचा अभ्यास तोडका पडतो. त्यामुळे ज्यांना रोबोटीक्समध्ये उत्तम करिअर करायचे आहे, अशा विद्यार्थांना माझा सल्ला आहे कि त्यांनी अगदी ११-१२ वी पासूनच ईलेक्ट्रोनिक्सचा सखोल अभ्यास करावा आणि सोबत वेगवेगळे प्रोग्रामिंगचे अभ्यासक्रम पूर्ण करावेत, म्हणजे, मग बी. ई./बी. टेक. आणि एम. टेक. करून दुहेरी प्राविण्य प्राप्त करणे सहज शक्य होईल. भारतातील काही महत्वाची महाविद्यालये आणि विद्यापीठे खाली दिली आहेत जेथून तुम्ही रोबोटिक्स मध्ये बी. टेक./एम. टेक. हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता.

For B.Sc./B.Tech./B.E.

  1. Bharath University – Bharath Institute of Higher Education & Research(Tamil Nadu)
  2. Maharishi Markandeshwar Engineering College – Maharishi Markandeshwar University(Haryana)
  3. Shanmugha Arts, Science, Technology & Research Academy – Shanmugha Arts Science Technology and Research Academy (SASTRA) University (Tamil Nadu)
  4. Sri Belimatha Maha Sahamsthana Institute Of Technology – Visvesvaraya Technological University (Karnataka)
  5. Srm University,chennai – SRM University(Tamil Nadu)
  6. Mahatma Gandhi Institute of Technology – CBIT(A.P)
  7. Manipal University – Manipal University (Karnataka)
  8. GCET – GCET (Gujarat)
  9. Sardar Patel University – Sardar Patel University(Gujarat)

For M.Sc./M.Tech./M.E.

  1. M.S. University, Baroda, conducts a master’s programme with specialization in automation control and robotics.
  2. The Institute of Technology under the Banaras Hindu University conducts M.Tech. Production
  3. The Centre for Robotics and Mechatronics at IIT-Kanpur offers a master’s programme in Robotics Engineering.
  4. Jadavpur University, Kolkata – 700032, offers M.E. Robotics.
  5. The University of Hyderabad offers M.Tech. in Artificial Intelligence and Robotics.
  6. University College of Engineering under Osmania University, Hyderabad, offers M.E. / M.Tech. In Automation and Robotics.
  7. SASTRA, Thanjavur, affiliated to Bharatidasan University, offers a course in artificial intelligence at the Bachelor of Engineering degree-level.
  8. The Birla Institute of Technology and Science (BITS), Pilani – 333031, offers M.E. in Computer Science with robotics as a subject. 
  9. Engineering/ Industrial Management Engineering with Robotics and Automation as electives.
  10. Thapur Institute of Engineering and Technology, Patiala- 147004, conducts M.E. in CAD/ CAM and Robotics.
  11. Sri Sathya Sai Institute of Higher Learning Prasanthi Nilayam offers M.Tech. Computer Science with specialisation in artificial intelligence. It is closely associated with robotics.
  12. PSG College of Technology, Coimbatore, conducts M.Tech. Mechanical with robotics as an elective subject.
  13. SRM institute of Science and Technology, Kattankulathur, Kancheepuram district, offers M.Tech. Robotics.
  14. The Department of Electronics under the Cochin University of Science and Technology offers M.Sc. Electronic Science with specialization in artificial intelligence, robotics, microwave electronics and computer technology. First-class B.Sc. degree holders with not less than 60 per cent aggregate marks in electronics / computer science / physics (with electronics) are eligible for admission. Selection is based on CUSAT-CAT.

रोबोटीक्स् चे प्राथमिक शिक्षण घेणे का आवश्यक आहे?

ह्या कोर्सेस मुले इलेक्ट्रोनिक्स हार्डवेअर आणि प्रोग्रमिन्ग्ची चांगली ओळख होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना “C” प्रोग्रामिंग आणि रोबोटिक्स किट्सच्या माध्यमातून प्रात्यक्षिके शिकविली जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमात त्याचा खूप फायदा होतो. अधिक माहिती साठी मला e-mail पाठवू शकता.

तर मग, विद्यार्थी मित्रानो, चला आजपासूनच आपण रोबोटिक्सच्या विलक्षण आणि आत्यंतिक मनोरंजक विश्वात प्रवेश करून एका आगळ्यावेगळ्या करिअरची सुरुवात करूया.

Dr. Dattaraj Vidyasagar
Dr. Dattaraj Vidyasagar

M.S. Electronics & Telecomm. (Cleveland Institute of Electronics, Ohio), Associate Member (IETE, Kolkata), Panelist on Dr. Homi Bhabha Foundation, Google certified educator (Level-1), Mentor of Change (MoC-1619) Niti Ayog, Government of India, International Robotics Trainer, Veteran of Applied Electronics since 35+ years.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x